मुंबई विद्यापीठाच्या कबड्डीपटूंना मारहाण

November 17, 2011 5:12 PM0 commentsViews: 2

17 नोव्हेंबर

मुंबई विद्यापीठ कबड्डी टीमला मारहाण झाल्याची गंभीर घटना घडली. भोपाळमध्ये पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत भोपाळमधल्या बरकतुल्ला विद्यापीठाच्या टीमने मुंबई विद्यापीठ टीमच्या खेळाडूंना मारहाण केली.

मुंबईची सलामीची लढत होती ती बरकतुल्ला विद्यापीठाशी. या लढतीत मुंबई विद्यापीठाने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. बरकुतल्ला विद्यापीठाला जिंकणे कठिण आहे असं दिसल्यानंतर त्यांनी मुंबईच्या खेळाडूंना त्रास देणं सुरु केलं. प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या बरकतुल्ला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यानी मुंबईच्या खेळाडूंवर दगड मारण्यास सुरुवात केली.

खेळाडूंनी ही बाब पंचाच्या निदर्शनास आणून दिली. पण याचा काहीही फायदा झाला नाही, उलट मुंबईच्या खेळाडूंना मारहाण सुरु झाली. यात ओमकार जाधव, दिनेश परब, राजू लोहार आणि अक्षय मिराशी हे मुंबई विद्यापीठाचे खेळाडू जबर जखमी झाले आहेत.

close