टू जी स्पेक्ट्रम वाटपाप्रकरणी दुसरी एफआयआर दाखल

November 19, 2011 10:37 AM0 commentsViews: 2

19 नोव्हेंबर

टू जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी सीबीआयने स्पेक्ट्रमच्या अतिरिक्त वाटपाबद्दल नविन केस दाखल केली आहे. हे वाटप दिवंगत टेलिकॉम मंत्री प्रमोद महाजन यांच्या कारकिर्दीत असताना झाल्याची माहिती आहे. सीबीआयने आज मुंबईचं व्होडाफोन कंपनीचं, गुरगावचे एअरटेलचं तसेच माजी टेलिकॉम सचिव आणि बीएसएनलचे माजी संचालक यांची चौकशी केली. प्रमोद महाजन 2001 ते 2003 या काळात टेलिकॉम मंत्री होते. 2001 ते 2007 च्या काळातल्या स्पेक्ट्रम वाटपाबाबत चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते. त्यानंतर आज ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यामध्ये दयानिधी मारन यांच्यावर दाखल केलेल्या एफआयआर नंतरची ही या प्रकरणातली दुसरी एफआयआर आहे.

close