शिवसेनेचा रेशन ऑफिसवर मोर्चा

November 17, 2011 5:19 PM0 commentsViews: 5

17 नोव्हेंबर

शिवसेनेच्या दादर विभागातर्फे आज रेशनकार्ड ऑफिस आणि महापालिकेच्या जी नॉर्थ वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढण्यात आला. सिद्धीविनायक मंदिराजवळ असलेल्या नर्दुल्ला टँक मैदानात उघड्यावर संसार मांडलेल्या अनेक बेघर लोकांना काँग्रेसतर्फे बोगस रेशनकार्ड दिली जातायत असा आरोप करत शिवसेनेने ही रेशनकार्ड रद्द करण्याची मागणी केली. शासनाच्या बेघर अंत्योदय योजनेच्या माध्यमातून रेशनकार्ड दिले जातायत आणि याच रेशनकार्डांद्वारे बोगस मतदार तयार केले जात आहे. असा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला. दोनच दिवसांपुर्वी रात्री दहानंतर शासकीय अधिकार्‍यांतर्फे या मैदानाच्या फुटपाथवर राहाणार्‍यांचे रेशनकार्ड देण्यासाठी तपासणी करण्यात आली, याकडेही शिवसेनेने संबंधित अधिकार्‍यांचे लक्ष वेधलं.

close