राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपमध्येच दुमत

November 17, 2011 5:25 PM0 commentsViews: 3

17 नोव्हेंबर

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं राम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा असल्याचं भाजप नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या भाजप प्रभारी उमा भारती यांनी म्हटंलं आहे. पण हा निवडणुकीचा मुद्दा नाही असं भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजपमध्येच एकमत नसल्याचं दिसतं आहे.

close