रिटेल क्षेत्रात 51 टक्के परकीय गुंतवणुकीला मंजुरी

November 17, 2011 5:31 PM0 commentsViews: 2

17 नोव्हेंबर

भारतामध्ये मल्टी ब्रॅण्ड रीटेल क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याविषयीच्या प्रस्तावाला केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली. 51 टक्के परकीय गुंतवणुकीला मल्टी ब्रॅण्ड रिटेल क्षेत्रात परवानगीबाबतचा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर आता पुढच्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा होईल.

close