सुखराम यांना 5 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा

November 19, 2011 5:50 PM0 commentsViews: 2

19 नोव्हेंबर

1996 च्या दूरसंचार घोटाळ्याप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांना पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टाने ही शिक्षा सुनावली. सुखराम हे पी. व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये दूरसंचार मंत्री होते. त्यावेळी हरयाणा टेलिकॉम लिमिटेड या खासगी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देताना झुकतं माप दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने त्यांना गुरुवारी दोषी ठरवलं होतं. सुखराम यांचे वय 86 वर्षं आहे. त्यामुळे वयाच्या आधारावर आपल्याला दया दाखवण्यात यावी अशी याचिका सुखराम यांनी दाखल केली होती. पण, सुखराम भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांत गुंतलेले असल्याने त्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी अशी विनंती सीबीआयने केली होती.

दरम्यान, माजी दूरसंचार मंत्री सुखराम कोर्टाबाहेर येत असताना त्यांच्यावर एका तरुणांने हल्ला केला. हरविंदर सिंह असं त्याचं नाव आहे. त्याच्याकडे कोणतेच हत्यार मिळाले नाही. या अगोदरही हा तरुण सुखराम यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो लोकांनी हाणून पाडला. आज सुखराम कोर्टाबाहेर येत असताना हरविंदरने हल्ला चढवला. सुखराम यांना काही विजा पोहचवण्याअगोदरच पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले.

close