सचिनने महाशतक केल्यावर 100 सोन्याची नाणी भेट !

November 19, 2011 2:55 PM0 commentsViews: 2

19 नोव्हेंबर

क्रिकेटप्रेमींना प्रतीक्षा आहे ती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सेंच्युरीची. पहिल्या दोन्ही टेस्टमध्ये त्याला सेंच्युरी करता आलेली नाही. पण आता घरच्या मैदानावर सचिन ही रेकॉर्डब्रेक सेंच्युरी पूर्ण करेल असा विश्वास क्रीडाप्रेमींना आहे. सचिनची ही रेकॉर्डब्रेक सेंच्युरी साजरी करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनही सज्ज झालं आहे. वानखेडे मैदानावर सेंच्युरी केल्यास सचिन तेंडुलकरला 100 सोन्याची नाणी एमसीएतर्फे देण्यात येणार आहेत एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी ही घोषणा केली. भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान येत्या बावीस तारखेपासून मुंबईच्या वानखेडे मैदानावर तिसरी आणि शेवटची टेस्ट मॅच खेळवली जाईल. भारताने याआधीच टेस्ट सीरिज जिंकली आहे.

close