शहीद तुकाराम ओंबळेंच्या पुतळ्याची प्रतिकृती

November 19, 2011 3:21 PM0 commentsViews: 5

19 नोव्हेंबर

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामध्ये प्राणाची आहुती देऊन पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला जिवंत पकडण्याची कामगिरी दिवंगत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी बजावली होती. त्यांच्या या साहसाची आठवण म्हणून गिरगाव चौपाटीवर त्यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. शिल्पकार राजन यावलकर यांनी हा पुतळा साकारला आहे. आज या पुतळ्याची मातीची प्रतिकृती प्रेस क्लबमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. गिरगाव चौपाटीवर येत्या 26 नोव्हेंबरला तुकाराम ओंबळे यांचा अर्धाकृती ब्राँझ पुतळा बसवण्यात येईल.

close