सरपंचाने केलेल्या मारहाणीत संदीपची प्रकृती चिंताजनक

November 19, 2011 3:27 PM0 commentsViews: 9

19 नोव्हेंबर

रत्नागिरीमधल्या तुळसणी गावात मारहाण झालेल्या कुटुंबातल्या संदिप बेर्डे या तरुणाची प्रकृती अजुनही चिंताजनक आहे. त्याच्याबरोबर त्याच्या भावावरही कोल्हापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुळसणी गावातल्या लक्ष्मी बेर्डे या विधवा महिलेसह तिच्या कुटुंबातल्या चार जणांना सरपंच आणि त्याच्या साथीदारांनी 16 नोव्हेंबरला जीवघेणी मारहाण केली होती. वाळीत टाकलेल्या आपल्या कुटुंबाला मारेक-यांपासून पोलीस संरक्षण देत नसल्याचीही खंत संदीपचा भाऊ प्रदीप बेर्डे याने व्यक्त केली.

close