दुर्मिळ 200 माऊथ ऑर्गनचा संग्रह करणारा अवलिया

November 19, 2011 4:19 PM0 commentsViews: 6

19 नोव्हेंबर

संगीत हे सामर्थ्यवान असते. संगीत हे मनुष्याला हसवते आणि रडवते. मनुष्याच्या प्रत्येक सुख दु:खात संगीत मानवाला आधार देण्याचं काम करते. विरंगुळा आणि करमणूक करण्यासाठी आपण संगीत ऐकतोच. पण सांगलीतल्या सुनील लाड यांनी शंभर वर्षांपुर्वीच्या दुर्मिळ अशा दोनशे माऊथ ऑर्गनचा अनोखा संग्रह केला आहे. सुनील यांच्याकडे एक इंचाचा सर्वात लहान तर अर्ध्या फुटाचा सर्वात मोठा माऊथ ऑर्गन आहे. विविध देशातील माऊथ ऑर्गनचा हा संग्रह करण्यासाठी सुनील यांना वीस वर्षांचा कालावधी लागला. त्यांच्याकडे जर्मनी, चीन, फ्रान्स यासारख्या विविध देशातले दुर्मिळ असे माऊथ ऑर्गन आहेत. मेटल, लाकडी आणि प्लॅस्टिकपासून बनवलेल्या माऊथ ऑर्गनचा हा अनोखा संग्रह आहे. सुनील यांनी माऊथ ऑर्गनचा छंद आपल्यापुरताच मर्यादित न ठेवता त्यांनी मोफत माऊथ ऑर्गन शिकवण्याचे कामही हाती घेतलं आहे. संगीताचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे हीच सुनील यांची भूमिका आहे.

close