बियाणे मंडळानेच दिली सडक्या बटाट्याची बियाणे

November 19, 2011 4:33 PM0 commentsViews: 15

गोपाल मोटघरे, मुंबई

19 नोव्हेंबर

राष्ट्रीय बियाणे मंडळाने भंडारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रीय फळोत्पादन योजने अंतर्गत मंडळ कृषी अधिकार्‍यांनी तुमसरच्या 31 शेतकर्‍यांकरिता 1700 रुपये प्रती क्विंटल या दराने बटाटा लागवडीचं बियाणे मागवलं होतं. या बटाट्याच्या बियाण्यांकरिता 2 लाख 71 हजार रुपये शेतकर्‍यांकडून गोळा करण्यात आले.

मात्र राष्ट्रीय बियाणे कंपनीने शेतकर्‍यांना निकृष्ट दर्जाची आणि सडक्या बटाट्याची बियाणे दिली. पाठवण्यात आलेली बियाणे ही आकारानी मोठी व वजनाने कमी सुद्धा होती. ही बियाणे गावात येताच शेतकर्‍यांनी बटाट्याच्या बियाण्याची पाहणी केली. सडकी आणि निकृष्ट बियाणे पाहून गावकर्‍यांनी मंडळ कृषी अधिकर्‍यांचे कार्यालय गाठले. मंडळ कृषी अधिकारी आणि आलेल्या तज्ञांच्या मंडळाने या बटाट्याची पंचनामा केला असता त्यांना ही बियाणेच निकृष्ट असल्याचे आढळून आलं. संतापलेल्या शेतकर्‍यांनी ही बटाट्याचे हे बियाणं उकीरड्यावर फेकून दिली आहेत.

ही बियाणे गावात येताच शेतकर्‍यांनी बटाट्याच्या बियाण्याची पाहणी केली. सडकी आणि निकृष्ट बियाणे पाहून गावकर्‍यांनी मंडळ कृषी अधिकर्‍यांचे कार्यालय गाठले. मंडळ कृषी अधिकारी आणि आलेल्या तज्ञांच्या मंडळाने या बटाट्याची पंचनामा केला असता त्यांना ही बटाट्याची बियाणे निकृष्ट असल्याचे आढळून आले.

निकृष्ट बटाट्यांच्या बियाण्यांमुळे शेतकर्‍यांच्या मोठे नुकसान झाले आहे. संतापलेल्या शेतकर्‍यांनी ही बटाटे उकीरड्यावर टाकून दिली आहेत. राष्ट्रीय बियाणे मंडळामुळे शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय बियाणे मंडळाने शेतकर्‍यांची बियाण्यांची रक्कम त्वरीत परत करुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. राष्ट्रीय बियाणे मंडळ ही भारत सरकारशी संलग्न संस्था आहे. जर राष्ट्रीय बियाणे मंडळाकडूनच शेतकर्‍यांची अशी फसवणूक झाली तर शेतकर्‍यांनी कोणत्या बियाणे कंपनीवर विश्वास करावा असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

close