सीएट पुरस्काराने वीरेंद्र सेहवागचा गौरव

November 20, 2011 1:13 PM0 commentsViews: 2

20 नोव्हेंबर

दिग्गज क्रिकेटपटूंच्या उपस्थितीत काल मुंबईत सीएट क्रिकेट पुरस्कार सोहळा पार पडला. 2010 – 2011 या वर्षांसाठी दिल्या जाणार्‍या या पुरस्कारांवर भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. 9 पुरस्कारांपैकी 5 पुरस्कार भारतीय खेळाडूंनी पटकावले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त भारताचा धडाकेबाज बॅट्समन वीरेंद्र सेहवागला विशेष पुरस्कराने सन्मानित करण्यात आलं. तर भारतीय क्रिकेटमधल्या योगदानाबद्दल व्ही व्ही एस लक्ष्मणचा गौरव करण्यात आला.

सुनिल गावसकर यांच्या हस्ते या दोघांना पुरस्कार देण्यात आले. विराट कोहली यावर्षीचा सर्वोत्तम युवा क्रिकेटपटू ठरला. तर सुरेश रैना टी-20 प्लेअर ऑफ द इयरचा मानकरी ठरला. वर्ल्डकपच्या फायनलमध्ये गौतम गंभीरने केलेली 97 रन्सची खेळी या वर्षातील सर्वोत्तम इनिंग ठरली. याशिवाय इंग्लंडच्या जोनाथन ट्रॉटने यावर्षातला सर्वोत्तम क्रिकेटपटू आणि बॅट्समन असे 2 पुरस्कार पटकावले. तर सर्वोत्तम बॉलर म्हणून इंग्लंडचाच जेम्स अँडरसन मानकरी ठरला. वेस्टइंडिजचा फास्ट बॉलर कर्टनी वॉल्श यांना यंदाच्या जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

close