‘मै भी अण्णा, तू भी अण्णा’ !

November 19, 2011 5:36 PM0 commentsViews: 6

19 नोव्हेंबर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण खुद्द अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आलं. हा पुतळा पाहून खुद्द अण्णा म्हणाले की, खरा कोणता आहे असा प्रश्न अण्णांनी विचारला. हा पुतळा सुनील कंडनलुर यांनी तयार केला आहे. आज राळेगणसिद्धीत अण्णांच्या आई लक्ष्मीबाई हजारे यांचा आज नववा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त आईच्या कविता या कवीसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अण्णांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं. आता हा पुतळा लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे.

close