पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

November 20, 2011 2:03 PM0 commentsViews: 3

20 नोव्हेंबर

पुणे पोलिसांनी एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. काही सीरियल्समध्ये साईड रोल करणार्‍या काही अभिनेत्री या पुण्यात येऊन देहविक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच काल पोलिसांनी सापळा रचून या अभिनेत्रीला अटक केली. तिच्यासोबत स्पॉटबॉय म्हणून काम करणार्‍या एकाला अटक करण्यात आली आहे. 'कसोटी जिंदगी की' या प्रसिद्ध हिंदी सीरियलमध्ये काम केले आहे. तर 'लमहा' या हिंदी सिनेमातही तीनं काम केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही अभिनेत्री मुळची काश्मिरची असून तिचा स्पॉट बॉय निरज हा दिल्लीचा आहे. हे दोघे पुण्याला आल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केलीय. शनिवारी रात्री अभिनेत्रीला एका फाईव्ह स्टार हॉटेलमधून अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या सामाजिक शाखेनं टाकेलेल्या धाडीत हा प्रकार उघड झाला.

close