जीव मिल्खा सिंग जागतिक रँकिंग 46व्या स्थानावर

November 18, 2008 1:40 PM0 commentsViews: 20

18 नोव्हेंबर भारताचा नंबर वन गोल्फर जीव मिल्खा सिंगने गेल्याच आठवड्यात सिंगापूर ओपन स्पर्धा जिंकली.त्याच्या या कामगिरीमुळे जागतिक रँकिंगमध्ये त्याने पुन्हा एकदा पहिल्या पन्नास खेळाडूंत स्थान मिळवलं आहे. सध्या तो 46व्या स्थानावर आहे. तसंच या वर्षांच्या अखेरपर्यंत पहिल्या पन्नास खेळाडूंतलं स्थान कायम राखलं, तर त्याला पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये होणा-या अगस्ता मास्टर्स स्पर्धेत थेट प्रवेश मिळेल.यावर्षी जीव मिल्खा सिंग सुरेख फॉर्ममध्ये आहे. पीजीए चँपियनशिपमध्येही तो नवव्या स्थानावर होता. मोठ्या स्पर्धेत पहिल्या दहात स्थान मिळवायची ही त्याची पहिलीच खेप. यापूर्वी 2006मध्ये जीव जागतिक क्रमवारीत 37व्या स्थानावर होता.पण त्यानंतर त्याची कामगिरी मात्र घसरली आणि तो साठाव्या स्थानावर फेकला गेला.असं असलं तरी यावर्षी आत्तापर्यंत त्याने तीन स्पर्धा जिंकल्या आहेत.

close