मुद्दा कापसाचा : जळगावमध्ये गिरीश महाजनांचे उपोषण सुरूच

November 20, 2011 2:14 PM0 commentsViews: 1

20 नोव्हेंबर

कापसाच्या वाढीव हमीभावासाठी अमरावतीत बडनेरचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी उपोषण मागे घेतलं आहे. पण जळगावमध्ये भाजप आमदार गिरीश महाजन यांचं उपोषण अजूनही सुरूच आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. कापसाला प्रति क्विंटल 6 हजार भाव मिळावा अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली. महाजन यांच्या आंदोलनाला प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. पण महाजन यांची प्रकृतीसुद्धा आता खालावत चालली आहे. त्यांचे वजन तीन किलोने कमी झालं आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यात काल या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. तिथे चार एसटींची तोडफोड करण्यात आली होती.

close