दरवाढीवर नियंत्रण ठेवणे सरकारलाही अवघड – मॉन्टेकसिंग अहलुवालिया

November 20, 2011 9:21 AM0 commentsViews: 6

20 नोव्हेंबर

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईत सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे तर तिकडे सरकारनेही वाढत्या महागाई पुढे हात टेकले आहे. पुढच्या वर्षभरात महागाईचा दर कमी झाला नाही तर वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवणं सरकारला कठीण जाईल अशी कबुली नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांनी दिली. सीएनएन-आयबीएन (CNN-IBN) वरच्या डेव्हिल्स ऍडव्होकेट या कार्यक्रमात ते बोलत होते. येत्या वर्षभरात महागाई कमी करणे जर सरकारला जमलं नाही तर परिस्थिती आणखी बिकट होईल असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.दरम्यान, वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या केंद्रातल्या घटक पक्षांकडूनही सरकारवर सतत दबाव येतोय.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात, वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.युपीएच्या घटकपक्षांनाही याचा फटका बसतोय.तर तृणमूल काँग्रेसचे नेते मुकुल रॉय यांनाही पवार यांच्या या वक्तव्याला दुजोरा दिला आहे.

close