दिल्लीत भीषण आगीत होरपळून 12 जण ठार

November 20, 2011 5:13 PM0 commentsViews: 65

20 नोव्हेंबर

पुर्व दिल्लीतल्या नंदनगरी भागात एका समारंभा दरम्यान भीषण आग लागली आहे. या आगीत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. तृतीयपंथीयांच्या एका कार्यक्रमात ही आग लागली. मृत्यूची संख्या अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.जखमींना जवळच्या जिटीबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यानअग्नीशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार या कार्यक्रमात पाच हजारांच्या जवळपास लोकांचा सहभाग होता. घटनास्थळी प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार ही आग सात वाजता लागली. नंदनगरी येथील कम्युनिटी सेंटरमध्ये तृतीयपंथीयांचा समारोह सुरू होता. यावेळी अचानक मंडपाला आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

close