रवी राणा यांनी उपोषण सोडले

November 20, 2011 9:48 AM0 commentsViews: 4

20 नोव्हेंबर

कापसाला सहा हजार हमीभाव देण्यात यावा या मागणीसाठी गेल्या सहा दिवसांपासून उपोषण करणारे बडनेरचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी आपलं उपोषण सोडलं. गेल्या सहा दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरु होतं. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. राणा यांच्या किडनीवर सूज आली आणि ह्रदयावर दाब आल्यामुळे काल शनिवारी रात्री त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. राणा यांची आज कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं पत्र दिलं आणि उपोषण सोडण्याची विनंती केली. त्यानंतर अखेर सातव्या दिवशी राणा यांनी कापसाच्या वाढीव दरासाठी सुरु असलेलं आंदोनल अखेर मागे घेतलं. कापसाच्या मुद्यावर येत्या 23 नोव्हेंबरला कापसाच्या मुद्यावर सर्वपक्षीय बैठक घेतली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी राणा यांना आश्वासन दिले आहे. जर सर्वपक्षीय बैठकीत कोणताचा निर्णय झाला नाही तर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा रवी राणा यांनी दिला आहे.

close