निवडणुकीसाठी माझे नाव वापरु नका – अण्णा हजारे

November 21, 2011 9:47 AM0 commentsViews: 1

21 नोव्हेंबर

महाराष्ट्रात येणार्‍या आगामी निवडणुकांमध्ये कुठल्याही राजकीय पक्ष आणि व्यक्तींनी अण्णा हजारे आणि त्यांच्या संघटनेचे नाव वापरू नये अशी सुचना करण्यात आली आहे. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक काल राळेगणमध्ये झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समिती या निवडणुकांमध्ये कुणालाही पाठिंबा देणार नाही असंही या बैठकीत ठरवण्यात आलंय. अण्णांच्या नावाचा वापर झाल्यास त्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीने दिला आहे.

close