औरंगाबादमध्ये नावनोंदणी करण्यासाठी अर्जच नाहीत

November 18, 2008 9:15 AM0 commentsViews: 1

18 नोव्हेंबर औरंगाबादसिटिझन जर्नलिस्ट संतोष पाटीलऔरंगाबाद शहरातील कित्येक वॉर्डात नागरिकांना गेल्या चार दिवसांपासून मतदार यादीतल्या नावनोंदणीसाठी अर्ज मिळले नाही.10 ते 24 नोव्हेंबर दरम्यान मतदार यादीत नवीन नावनोंदणी तसंच मतदार ओळखपत्रांसंबधीची कामे सुरू आहेत. पण शहरातील कित्येक मतदान केंद्रांवर नावनोंदणी करण्यासाठी पुरेसे अर्जच उपलब्ध नाहीत. निवडणूक कर्मचारी नागरिकांनाच फॉर्मच्या झेरॉक्स आणण्याचा सल्ला देत आहेत. या विषयी आमचे सिटिझन जर्नलिस्ट संतोष पाटील यांचा रिपोर्ट.औरंगाबाद इथल्या निवडणूक अधिका-यांनी कित्येक दिवस नाव नोंदणीचे फॉर्मचं दिलेले नाहीत.तसंच इथले निवडणूक अधिकारी मतदारांनाचं त्या फॉर्मच्या झेरॉक्स आणायचा सांगतात.मुळात हे काम शासनाचं आहे. तसंच काही व्यवसायिक, दुकानदार आपापले व्यवसाय बंद ठेवून येत असल्यामुळे त्याचं बरंच नुकसान होतं आहे.

close