मैदान वाचवण्यासाठी बच्चेकंपनीची गांधीगिरी

November 21, 2011 10:11 AM0 commentsViews: 1

21 नोव्हेंबर

नाशिक महापालिकेच्या घरकूल योजनेला आता शाळेतल्या मुलांनी गांधीगिरी पद्धतीने विरोध केला. या बच्चेकंपनीने पदाधिकार्‍यांना गुलाबाची फुलं देऊन आपला निषेध व्यक्त केला. महापालिकेने बांधलेल्या घरकुल योजनेतली घरं रिकामी ओस पडली आहेत तर दुसरीकडे गंगापूरमधल्या या शाळेच्या मैदानावर घरकुलासाठी पाया खोदला जातोय. या ठिकाणी सोमेश्वर झोपडपट्टीतल्या कुटुंबांसाठी जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत ही घरकुल योजना राबवण्यात येणार आहे. पण याठिकाणी घरं बांधण्यास इथल्या नागरिकांचा विरोध आहे आणि झोपडपट्टीवासीयांचाही विरोध आता. आता तर शाळेचे विद्यार्थीच या लढ्यात उतरलेत कारण या बांधकामात त्यांच्या खेळायच्या मैदानाचा बळी जात आहे.

close