शिवसेनेच्या कापूस दिंडीला सुरूवात

November 21, 2011 7:50 AM0 commentsViews:

21 नोव्हेंबर

कापसाच्या आंदोलनात आता शिवसेनाही पूर्ण ताकदीनीशी उतली आहे. शिवसेनेनं आजपासून विदर्भात कापूस दिंडी काढली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या अमरावतीमधल्या गुरुकुंज मोझरीपासून या दिंडीची सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते दिवाकर रावते यांच्या नेतृत्तवाखाली निघणारी ही दिंडी 10 दिवस विदर्भातल्या वेगवेगळ्या भागातून जाणार आहे. 30 तारखेला या दिंडीचा वर्ध्यातील पवनार इथं समारोप होणार आहे.तर दुसरीकडे मराठवाड्याच्या राजधानीत औरंगाबादमध्ये शिवसेनेनं आंदोलन केलं आहे. कापसाला किमान सहा हजार रुपये हमी भाव द्यावा या मागणीसाठी शिवसेनेने औरंगाबाद-पुणे महामार्गावर रास्ता रोको केला. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

close