राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठोकले कपास कार्यालयाला कुलूप

November 21, 2011 7:57 AM0 commentsViews: 3

21 नोव्हेंबर

कापूस प्रश्नावर विदर्भात आंदोलनाचा भडका उडाला आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी पक्षानही उडी घेतली. अकोला इथ भारतीय कपास निगम (सीसीआय) च्या कार्यालयाला आज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी कुलूप ठोकलं. कापसाला वाढीव हमी भाव देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. कार्यालयाला टाळं ठोकल्यामुळे आत अडकलेल्या कर्मचार्‍यांमध्ये काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि तब्बल 2 तासानंतर महाप्रबंधक आणि कर्मचार्‍यांची सुटका केली.

close