सेन्सेक्स 425 अंकानी घसरला

November 21, 2011 2:50 PM0 commentsViews: 3

21 नोव्हेंबर

जागतिक शेअरबाजारातील घसरणीचा फटका आज भारतीय शेअरबाजारालाही बसला आणि मोठी घसरण पहायला मिळाली. सेंसेक्स 16,000च्याही खाली येत 425 अंकांच्या घसरणीनंतर 15946 वर बंद झाला. तर निफ्टीही 127 पॉईंट्सनी घसरून 4778वर बंद झाला. बँक, रियल्टी, ऑटो, पॉवर, ऑईल ऍण्ड गॅस या सगळ्याचे क्षेत्रात घसरण पहायला मिळाली. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रूपयाचंही अवमूल्यन झालं. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव आज 52 रुपयांपर्यंत गेला.

close