वही विसरली म्हणून चिमुरड्याला अमानुष मारहाण

November 22, 2011 11:16 AM0 commentsViews: 12

22 नोव्हेंबर

वही घरी विसरल्याच्या कारणावरून सीनियर केजीत शिकणार्‍या चार वर्षांच्या मुलाला शिक्षिकेने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात घडला. यामध्ये या मुलाच्या डोळ्याजवळ जबर मार लागली आहे. हडपसर भागातल्या सोनाई इंग्लिश स्कूलमध्ये केजीत शिकणार्‍या तेजस ठोसर या मुलाने इंग्लिश विषयाची वही घरी विसरला. या कारणावरून शिक्षिका हसी देसाई यांनी त्याला डस्टर फेकून मारलं. तेजसच्या उजव्या डोळ्याला यामुळे जबरदस्त मार लागला तेजसला यापूर्वीही अशीच मारहाण झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला. याबाबत आता तेजसच्या पालकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

close