सिंधुदुर्गात जमिनी बळकावण्याचे प्रकार सुरूच

November 22, 2011 11:07 AM0 commentsViews: 3

22 नोव्हेंबर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तलाठी आणि मंडळ अधिकार्‍यांना हाताशी धरून बेकायदेशीर मार्गाने जमीन बळकावण्याचे प्रकार सुरूच आहेत. दोडामार्ग तालुक्यातल्या आडाळी गावातही असाच प्रकार गावकर्‍यांनी उघडकीस आणला. 100 हून जास्त गावकर्‍यांच्या मालकीच्या असलेल्या 650 एकर जमिनीपैकी सुमारे 120 एकर जमिनीच्या मालकीत रमेश भारद्वाज या व्यक्तीच्या कुटुंबातील नावं लावण्यात आली. सामायिक जमिनीचं वाटप नाही, मोजणीही नाही त्याबरोबरच सगळ्या हिस्सेदारांची संमतीही नाही असं असतानाही भारद्वाज यांच्या नावावर जमीन करण्यातआली. या सगळ्या प्रकारात तलाठी आणि मंडळ अधिका-यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आडाळीच्या गावकर्‍यांनी केला. असले गैरप्रकार थांबवा आणि दोषी कर्मचार्‍यांना शिक्षा करा नाहीतर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आडाळीकरांनी दिला.

close