नाशिकमध्ये तरूणीला जिवंत जाळले

November 22, 2011 1:44 PM0 commentsViews: 1

22 नोव्हेंबर

नाशिकपासून 150 किलोमिटर अंतरावर असणार्‍या कळवण तालुक्यात दुपारी तीनच्या सुमारास एका 24 वर्षीय तरुणीला जिंवत जाळण्याची घटना घडली आहे. रंजना पवार असे या तरुणीचे नाव आहे. शेजार्‍यांशी झालेल्या किरकोळ कारणावरुन ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. रंजना पवार ही पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. काही दिवसांपूर्वीच आपल्या वृध्द आई – वडिलांसोबत ती कळवण येथे राहण्यासाठी आली होती. आज दुपारी तीनच्या सुमारास तिचे शेजार्‍यांशी किरकोळ कारणावरुन भांडण झाले. यानंतर संतप्त शेजार्‍यांनी रंजनाला घरात घुसून बेदम मारहाण केली आणि रॉकेल टाकून पेटवून दिले. यात रंजना 60 टक्के भाजली. रंजनाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं आहे.

close