राजू शेट्टींच्या कापूस परिषदेला परवानगी नाकारली

November 22, 2011 10:38 AM0 commentsViews:

22 नोव्हेंबर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टींच्या कापूस परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कापूस उत्पादक शेतकर्‍यांना योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कापूस परिषद घेतली जाणार होती. येत्या 27 नोव्हेंबरला खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्त्वाखाली ही कापूस परिषद होणार होती. पण कायदा सुव्यवस्थेचं कारण पुढं करत पोलिसांनी ह्या कापूस परिषदेला परवानगी नाकारली.

close