रणबीर साकारणार किशोरदांची भूमिका

November 22, 2011 2:58 PM0 commentsViews: 7

मिहीर त्रिवेदी, मुंबई

22 नोव्हेंबर

रणबीर कपूरच्या रॉकस्टारमधल्या गायकाच्या भूमिकेला समीक्षकांसह रसिक प्रेक्षकांचीही दाद मिळाली. आता रणबीर पुन्हा एकदा गायकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. लिजंडरी गायक किशोर कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेल्या सिनेमात रणबीर खुद्द किशोर कुमार यांची भूमिका साकारणार आहे.

गेल्या वर्षी मार्च मध्ये झालेल्या या सोहळ्यानंतर रणबीर कपूर किशोरदांची भूमिका साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. किशोरदांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय अनुराग बासू किशोरदांच्या आयुष्यातील प्रसंग हुबेहुब मांडण्याचा प्रयत्न सिनेमातून केला जाणार आहे. पण किशोरदांचा मुलगा अमित कुमार आणि त्यांच्या इतर कुटुंबीयांबरोबर सिनेमाची क्रिएटीव्ह टीम किशोरदांच्या आयुष्यातील कुठले प्रसंग मांडावेत यावर सध्या चर्चा करत आहे.

पण रणबीरच्या म्हण्यानुसार स्क्रीपटचा फायनल ड्राफ्ट तयार असून लवकरच याला किशोरदांच्या कुटुंबीयांची संमती मिळेल. अमित कुमार यांनी स्क्रीपटमध्ये काही बदल तर सुचवले आहे. पण किशोरदांच्या भूमिकेसाठी रणबीरची झालेली निवड त्यांना योग्य वाटतेय. रॉकस्टारमधील भूमिकेसाठी जसा रणबीरवर कौतुकाचा वर्षाव झाला. त्याचप्रमाणे लिंजडरी गायक किशोरदांच्या भूमिकेतही रणबीर उठून दिसेल असं जाणकारांचं मत आहे.

close