‘स्टार बस’च्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

November 22, 2011 1:07 PM0 commentsViews: 1

22 नोव्हेंबर

नागपूरला स्टार बसमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाश्यांनी चेहर्‍यावर स्कार्फ बांधू नये असा फतवा बस प्रशासनाने काढला. तर नियम मोडणार्‍यांना 100 रुपये दंडही आकारला जातोय. ही बातमी आयबीएन लोकमतनने दाखवल्यानंतर आता शिवसेनेनं या फतव्याविरोधात आंदोलन सुरू केलं आहे. बस प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध करत आज शिवसैनिकांनी स्टार बसेस्‌मध्ये लावलेल्या या आदेशाचं पत्रक फाडलं. तसेच स्टार बस प्रशासनाच्या अधिकार्‍यांना घेराव घातला. त्यानंतर हा आदेश मागे घेण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्याचं शिवसैनिकांनी सांगितले आहे.

close