शिवसेनेच्या कापूस दिंडीचा टाकळीत मुक्काम

November 22, 2011 11:13 AM0 commentsViews: 7

22 नोव्हेंबर

कापसाला सहा हजार रुपये हमीभाव देण्यात यावा यामागणीसाठी शिवसेनेच्या कापूसदिंडीचा आजचा दुसरा दिवस आहे. काल गुरुकुंज मोझरी इथून या दिंडीची सुरुवात झाली होती. रात्री रहाटगावी ही दिंडी मुक्कामी होती. आज गाडगे महाराजांच्या समाधीच दर्शन घेवून दिंडी पुढील मुक्कामी निघाली आहे. आता ही दिंडी बडनेरा मार्गे लोणी (टाकळी) इथं जाणार आहे. दिंडीचा आज रात्री लोणीला मुक्काम असणार आहे. दिवाकर रावते यांच्यासोबत गुलाबराव गावंडे आणि इतर शिवसेना नेते दिंडीत सहभागी झाले आहेत. प्रत्येक चौकात आणि गावात या दिंडीचं शेतकर्‍यांकडून स्वागत होत आहे.

close