यापुढे ड्रायव्हिंग लायसन्स ओळखीचा पुरावा नाही !

November 22, 2011 4:24 PM0 commentsViews: 8

22 नोव्हेंबर

यापुढे ड्रायव्हिंग लायसन्स निवासी पत्त्याच्या पुराव्यासाठी वापरता येणार नाही. महाराष्ट्र सरकारने हा नवा अध्यादेश काढला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स फक्त वाहन चालवण्याचा परवाना म्हणून वापरण्यात येणार आहे. अनेकांनी खोट्या पत्त्याच्या आधारे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवल्याचे सिद्ध झाल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.

आता आधार कार्ड ओळखीचा पुरावा !

तर मतदानासाठी ओळखीचा पुरावा म्हणून आता आधार कार्डही ग्राह्य मानले जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हा नियम लागू होईल. या अगोदर पासपोर्ट, पॅन कार्ड असे 16 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जात होते.आता यामध्ये आधार कार्डाचाही समावेश करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केला आहे.

close