‎’लोकपाल’ अधिवेशनात आणणार – पंतप्रधान

November 22, 2011 5:00 PM0 commentsViews: 8

22 नोव्हेंबर

या हिवाळी अधिवेशनात सरकार लोकपाल विधेयक आणणार असल्याची ग्वाही पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अण्णांना दिलीय. पंतप्रधानांनी अण्णा हजारे यांना लिहिलेल्या पत्रात हे स्पष्ट केलं आहे. या हिवाळी अधिवेशनात लोकपाल विधेयक मंजूर झालं पाहिजे अशी मागणी करणारं पत्र अण्णांनी पंतप्रधानाना लिहिलं होतं. त्याला प्रतिसाद देत पंतप्रधानांनी अण्णांना पत्र पाठवून उत्तर दिलं.

close