कापूस प्रश्नी महाजनांचा उपोषण सोडण्यास नकार

November 23, 2011 9:25 AM0 commentsViews: 2

23 नोव्हेंबर

कापसाच्या वाढीव हमीभावासाठी जळगावमध्ये भाजप आमदार गिरीष महाजन यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस उजाडला आहे. त्यांचं वजनही 6 किलोनी कमी झालं आहे. महाजन यांची तब्येत चिंताजनक आहे. पण उपोषण सोडण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे. कापसाच्या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघावा म्हणून गिरीष महाजन यांनी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनाही पत्र लिहीलं आहे.

दरम्यान या आंदोलनाला शिवसेनेनंही पाठिंबा दिला आहे. शिवसेना नेते आमदार सुरेशदादा जैन आणि उपनेते गुलाबराव पाटिल यांनीही कार्यकर्त्यांसह महाजन यांची भेट घेतली. पश्चिम महाराष्ट्राला मंत्रिमंडळात संख्याबळाने चांगले प्रतिनिधीत्व असल्याने त्या भागातील शेतकर्‍यांचे प्रश्न हे लागलीच सुटतात.आणि म्हणूनंच उत्तर महाराष्ट्रातील प्रश्नांकडे मंत्रिडळाचं दुर्लक्ष आहे असा आरोप खान्देशातील नेत्यांनी केला आहे.

तर महाजन यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ भाजप महिला आघाडीने पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या घरावर धडक दिली. मंत्र्यांना घेरावही घातला. यावेळी गुलाबराव देवकर यांनी महिलांशी चर्चा केली आणि लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं.

close