सिंधुदुर्गात जंगली हत्तींचे धुमशान

November 23, 2011 9:33 AM0 commentsViews: 3

23 नोव्हेंबर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा जंगली हत्तींचं धुमशान सुरू झालं आहे. कुडाळ तालुक्यातल्या हिर्लोक गावात हत्तींनी शेतकर्‍यांच्या माड आणि केळीच्या बागा मोडून उद्‌ध्वस्त केल्या. पूर्ण वाढलेले माड हत्तींनी भुईसपाट केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. बांबूची बेटं, भातपीक आणि घरांचही मोठं नुकसान हत्तींनी केलं आहे. काही शेतकरीही हत्तींच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीनच हत्ती असल्याचे वनविभागाकडून वारंवार सांगितलं जात असलं, तरी पुन्हा एकदा नव्याने काही हत्ती आल्याचे शेतकर्‍यांकडून सांगितले जात आहे. दुसरीकडे माडांसाठी सरकारकडून मिळणारी फक्त 2 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळण्यासाठीही शेतकर्‍यांना तीन तीन वर्षं थांबावे लागतं असल्याने शेतकरी संतापले आहे.

close