नागपुरात शहीद गोवारींना श्रध्दांजली

November 23, 2011 10:08 AM0 commentsViews: 5

23 नोव्हेंबर

नागपूरच्या द पॉईंट जवळच्या गोवारी स्मारकावर आज हजारो गोवारी बांधवांनी शहीद गोवारींना श्रद्धांजली वाहिली. 23 नोव्हेंबर 1994 रोजी नागपूरच्या विधानभवनावर आपल्या मागण्यासांठी आदिवासी गोवारी बांधवांनी मोर्चा काढला होता. मात्र या मोर्चावर पोलिसांना लाठीमार केला. त्यामधे चेंगराचेगरी होऊन 114 गोवारी बांधवांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आज सतरा वर्ष पूर्ण झाली आहे. या दिवसाची आठवण म्हणून गोवारी बांधव नागपूरच्या द पॉईंट जवळ असलेल्या गोवारी स्मारक जवळ एकत्र येऊन या घटनेत मरण पावलेल्या गोवारी बांधवांना आदरांजली वाहतात. आजही शेकडो गोवारी बांधवांनी शहिदांना फुलं अर्पण करून आदरांजली वाहिली.

close