सायरस मिस्त्री ठरले रतन टाटांचे वारसदार

November 23, 2011 6:00 PM0 commentsViews: 5

23 नोव्हेंबर

टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटांच्या वारसदाराची आज घोषणा झाली. टाटा ग्रुपचे प्रमुखपद पहिल्यांदाच टाटा घराण्याच्या बाहेरची व्यक्ती येणार आहे. 43 वर्षाच्या सायरस मिस्त्रींची टाटा ग्रुपच्या डेप्युटी चेअरमनपदी निवड झाली. डिसेंबर 2012 मध्ये रतन टाटा रिटायर होणार आहेत. त्यानंतर सायरस मिस्त्री पदभार हाती घेतील. टाटांचा वारसदार निवडण्यासाठी 5 सदस्यांचंी निवड समिती तयार करण्यात आली होती.

मे महिन्यात या समितीने टाटा ग्रुपमधल्या आणि बाहेरच्या अनेक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यावर चर्चा करून आज टाटांच्या वारसदाराची घोषणा करण्यात आली. सायरस मिस्त्री हे हुशार आणि पात्र व्यक्ती असल्याचे रतन टाटा यांनी म्हटले आहे. दूरदृष्टी ठेवून त्यांची निवड करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर ही निवड करून टाटांनी माझा सन्मान केल्याचे सायरस यांनी म्हटले आहे. रतन टाटांच्या मार्गदर्शनाखाली कंपनीच्या भरभराटीसाठी पूर्ण योगदान देणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

सायरस मिस्त्री कोण आहेत

- 4 जुलै 1968 मध्ये जन्म- लंडनमधल्या इम्पिरिअल कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरींगची पदवी- लंडन बिझनेस स्कूलमधून एमबीए – सायरस मिस्त्री हे पालोनजी मिस्त्री यांचा धाकटा मुलगा – पालोनजी यांचे टाटा सन्समध्ये सर्वाधिक शेअर्स आहेत- सध्या सायरस हे शपूरजी पालोनजी ग्रुपचे एमडी आहेत- ऑगस्ट 2006 पासून ते टाटा सन्सच्या संचालक मंडळात आहेत

close