नाशकात तरुणीला जाळण्याप्रकरणी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल

November 23, 2011 11:11 AM0 commentsViews: 7

23 नोव्हेंबर

नाशिकच्या कळवण तालुक्यातल्या बेज गावात रंजिता पवार या तरुणीला जिवंत जाळल्याचा प्रकार घडला. शेजार्‍यांसोबत झालेल्या किरकोळ भांडणातून तिला जाळल्याची तिच्या कुटुंबीयांची तक्रार आहे. रंजिता काही काळ पुणे, नाशिकमध्ये नर्स म्हणून काम करत होती. गेल्या दोन महिन्यांपासून ती घरी होती. यावेळी शेजार्‍यांशी झालेल्या किरकोळ कारणामुळे भांडण झाले होते. संतप्त झालेल्या शेजार्‍यांनी रंजनाला घरात घुसून मारहाण केली आणि तिच्यावर रॉकेल ओतून पेटवून दिले. या प्रकरणी पोलिसांनी शेजारच्या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची खोटी माहिती दिल्याचा ठपका ठेवत रंजिताच्या नातलगांनी गावातल्या पोलीस पाटलांना मारहाण केली.

close