‘डर्टी पिक्चर’साठी इमरान संसदेच्या बाहेर

November 23, 2011 11:31 AM0 commentsViews: 1

23 नोव्हेंबर

हिंदी चित्रपटांच्या प्रमोशनसाठी अनेक फंडे शोधून काढले जातात. आज तर अभिनेता इमरान हाश्मी 'डर्टी पिक्चर' या त्याच्या नव्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी थेट संसदेपर्यंत पोहचला. संसद भवनाच्याबाहेर इमरानने आज या सिनेमाचं प्रमोशन केलं. इतकंच नाही तर यानिमित्त इमरान मेट्रोमधून फिरणार आहे आणि निजामुद्दीन दर्ग्याला ही भेट देणार आहे. एकेकाळची बोल्ड अभिनेत्री 'सिल्क स्मिता' वर हा सिनेमा आधारीत आहे. सिल्क स्मिताचा भूमिका विद्या बालनने साकारली आहे. येत्या महिन्याच्या दोन डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

close