टीव्ही मालिकांच्या तंत्रज्ञांचा संप मिटला

November 19, 2008 9:31 AM0 commentsViews: 4

19 नोव्हेंबर, मुंबईप्रॉडक्शन हाऊस वर्कर्सचा गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेला संप अखेर मिटला आहे. निर्माते आणि वर्कर्स असोसिएशन यांच्यात नुकतीच एक बैठक पार पडली. त्या बैठकीत संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून प्रेक्षकांना टीव्हीवर चालू असलेल्या मलिकांचे नवे भाग पहायला मिळणार आहेत.मालिकांच्या वाढत्या संख्येमुळे मालिकांच्या तंत्रज्ञांना जास्तीचं काम करावं लागायचं. या जास्तीच्या कामाचे तंत्राज्ञाना कधी पैसे मिळायचे नाहीत आणि मासिक पगारात वाढही झाली नाही. त्यामुळे मालिकांच्या तंत्रज्ञांनी 5 नोव्हेंबरपासून संप पुकारला होता. या संपामुळे प्रेक्षकांना मालिकांचे जुने भाग पहावे लागत होते. मालिकांच्या रिपिट टेलिकास्टमुळे फावल्या वेळात काय करावं हा प्रश्न टी.व्ही. रसिकांना पडला होता. मालिकांच्या तंत्रज्ञांनी आपला संप मागे घेतल्यामुळे 'फावल्या वेळात काय करावं' या प्रश्नावर उपाय मिळाला आहे.

close