कापूस प्रश्नी विरोधकांचा सरकारला 48 तासांचा अल्टीमेटम !

November 23, 2011 12:43 PM0 commentsViews: 4

23 नोव्हेंबर

कापूसप्रश्नी आज सकाळी झालेल्या सर्वपक्षीय चर्चेनंतर मंत्रिमंडळाची बैठक सुरु आहे. या बैठकीत कापूसप्रश्नी कोणता निर्णय घ्यायचा याबाबत चर्चा होतेय. मंत्रिमंडळाच्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत. कापूसप्रश्नी सरकारने 48 तासांच्या आत ठोस निर्णय घ्यावा अन्यथा राज्यभर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा भाजप आणि मनसेने दिला. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

close