आम्ही त्याला माफ केलं – सुप्रिया सुळे

November 24, 2011 2:15 PM0 commentsViews: 1

24 नोव्हेंबर

शरद पवार यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत दुदैर्वी घटना आहे या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. पवार यांच्यावर ज्या व्यक्तीने हल्ला केला आहे आम्ही त्या माणसाला माफ केलं आहे. पण अशा माथेफिरु लोकांवर पोलीस दलाने कारवाई करावी अशी मागणीही सुळे यांनी केली. त्याचबरोबर आम्ही सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकार्‍यांना प्रतिउत्तर न देण्याच्या सुचना केल्या आहे अशी माहितीही सुप्रिया सुळे यांनी आयबीएन लोकमतशी बोलतांना दिली.