पवारांवरील हल्ल्याच्या निषेधात कार्यकर्ते रस्त्यावर

November 24, 2011 12:46 PM0 commentsViews: 5

24 नोव्हेंबर

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर आज दुपारी एकच्या सुमारास एका माथेफिरु तरुणांने हल्ला केला. हरविंदर सिंग असं या तरुणांचे नाव आहे या तरुणांने पवारांच्या श्रीमुखात भडकवली. पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्व स्तारातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त होत आहे. तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त होत रस्त्यावर उतरले आहे. खुद्द शरद पवारांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. मात्र कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको,आंदोलन, धरणे सुरु केली आहे. अनेक ठिकाणी टायर जाळून कार्यकर्त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. निषेधाची सुरुवात पवारांच्या गावी बारामतीपासून सुरु झाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामती बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पुण्यात उद्या पुणे बंद पुकारण्यात आला आहे. तसेच मुंबई-पुणे जुना हायवे रोखण्यात आला. वरसोली टोल नाक्याजवळ हा रास्तारोको करण्यात आला यामुळे दोनही बाजूला 4 ते 5 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. तर नाशिकमध्ये कार्यकर्त्यांनी त्र्यंबकरोड, व्दारका आणि लासलगाव आणि कळवण इथं रास्ता रोको केला. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये शहागंज भागात काळे झेंडे दाखवून निदर्शन केली.

close