माझ्यावर हल्ला का झाला माहिती नाही – शरद पवार

November 24, 2011 2:19 PM0 commentsViews: 10

24 नोव्हेंबर

माझं कोणाशी वैर नाही, त्यामुळे माझ्यावर का झाला हे समजत नाही अस मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. महागाईसाठी कोणताही एक पक्ष कसा जबाबदार ठरू शकतो असा प्रश्नही पवारांनी उपस्थित केला. राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी जनतेला त्रास होईल असे कृत्य करु नये कायदा घेऊ नका असं आवाहन पवारांनी केलं. आपल्यावर हल्ला होताना मीडियाने तो रोखण्याचा प्रयत्न केला असंही पवार म्हणाले.

आज दुपारी नवी दिल्लीमध्ये जंतरमंतर जवळील एनडीएमसी सेंटरमध्ये इफकोच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी कृषिमंत्री शरद पवारांची उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर दुपारी एक वाजता पवार बाहेर येत असताना हरविंदर सिंग या माथेफिरु तरुणांने पवारांच्या श्रीमुखात भडकावली. आणि पवारांशी धक्काबुक्की केली. पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी तरुणावर झडप घालून ताब्यात घेतले. मागील आठवड्या माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांच्यावरही याच माथेफिरू तरुणांने हल्ला केला होता.

या कार्यक्रमात शरद पवार यांना कापूस प्रश्नी प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, यावेळी यावर उत्तर देणे योग्य नाही यासाठी टेक्सटाईल मंत्रालय आहे ते याबाबत बोलतील. पवारांच्या याच विधानाचा राग धरुन माथेफिरु तरुणांने हल्ला चढवला. यांच्याकडे घोटाळ्या शिवाय काही नाही हे सगळे चोर आहे असे जोर जोरात ओरडत होता. हरविंदर याने आपल्या खिश्यातून कृपाण काढून 'चीर दुंगा' असा दम भरत होता. मी चुकीचे काही केले नाही वाटलं तर मला मारा मी वेडा आहे. मी चूक केली नाही असं तो वारंवार सांगत होता. या अगोदर मीच सुखराम यांच्यावर हल्ला केला होता असंही माथेफिरु तरुण सांगत होता.

close