रिटेल क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला हिरवा कंदील

November 24, 2011 5:32 PM0 commentsViews: 22

24 नोव्हेंबर

रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. मल्टी ब्रँडमध्ये 51 टक्के आणि सिंगल ब्रँडमध्ये 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असल्याची प्रतिक्रिया वॉल मार्टसारख्या जगभरातल्या रिटेल कंपन्यांनी दिली. रिटेलमधील या थेट परकीय गुंतवणुकीमुळे शेतकरी आणि छोटे किराणा दुकानदार यांचं नुकसान होईल, असं म्हणत डावे पक्ष आणि भाजपनं या प्रस्तावाला जोरदार विरोध केला होता. पण सरकारने त्याला मंजुरी दिली. याबाबत संसदेत निवेदनही देण्यात येणार आहे.

close