माओवादी नेते किशनजी ठार

November 24, 2011 5:35 PM0 commentsViews: 5

24 नोव्हेंबर

माओवादी नेते किशनजी उर्फ कोटेश्वर राव पोलिसांच्या गोळीबारात ठार झाले आहे. सीआरपीएफने या बातमीला दुजोरा दिला. पश्चिम बंगालमधल्या जंगलमहलमध्ये सुरक्षा जवानांच्या चकमकीत किशनजी मारले गेले. सीआरपीएफ आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी ही संयुक्त मोहीम राबवली होती. दरम्यान पोलिसांनी पकडू नये, यासाठी किशनजीच्या सुरक्षा रक्षकांनीच त्यांना गोळ्या घालून ठार केलं असावं असंसुद्धा बोललं जातं आहे. पश्चिम बंगाल आणि ओरिसामधल्या अनेक नक्षलवादी कारवायांमध्ये किशनजीची प्रमुख भूमिका होती. किशनजीबरोबर असलेल्या आणखी तीन माओवाद्यीसुद्धा ठार झाल्याचं सांगितलं जातं आहे.

close