‘लोकपाल’च्या 90 टक्के मुद्यावर स्थायी समितीची सहमती

November 24, 2011 5:38 PM0 commentsViews: 2

24 नोव्हेंबर

संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज लोकपाल विधेयकाबाबत चर्चा झाली. लोकपाल विधेयकातल्या जवळपास 90 टक्के मुद्द्यांवर स्थायी समितीत सहमती झाल्याचं समजतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांना लोकपालच्या कक्षेत आणण्याचा मुद्द्यावर अजूनही मतभेद कायम आहेत. तर सीबीआयला थेट लोकपालच्या कक्षेत आणलं जाणार नाही. पण लोकपालला घटनात्मक दर्जा देण्यावर एकमत झाल्याचं समजतंय. प्रशासकीय अधिकार्‍यांविरोधात कारवाई करण्यासाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता नसेल. स्थायी समिती लोकपाल विधेयकासंबंधीचा अहवाल 7 डिसेंबरपर्यंत सरकारला सादर करणार आहे.

close