पवारांविषयी अण्णांची प्रतिक्रिया चुकीची – मुख्यमंत्री

November 25, 2011 2:31 PM0 commentsViews: 43

25 नोव्हेंबर

अण्णा हजारे यांनी पातळी सोडून टीका करणे चुकीचं असल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. काल गुरुवारी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला हरविंदर सिंग या माथेफिरु तरुणांने हल्ला केला. यावर प्रतिक्रिया देताना अण्णांनी एक ही मारा अशी खिल्ली उडवली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर आज दुपारी अण्णांच्या गावी राळेगणसिध्दीमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आत्मक्लेश आंदोलन करण्याचा प्रयत्न केला मात्र अण्णांच्या समर्थकांनी तो हाणून पाडला या घटनेची माहिती आपण घेत आहोत. कायदा कोणीही हाती घेऊ नये असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

close