गरोदर महिलेला नोएडा पोलिसांकडून मारहाण

November 19, 2008 11:03 AM0 commentsViews: 54

19 नोव्हेंबर, उत्तर प्रदेश नोएडा पोलिसांनी एका गरोदर महिलेला बेदम मारहाण केल्याचं उघड झालंय. प्रियांका नावाची ही महिला या घटनेत गंभीर जखमी झाली असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. एका खुनाच्या प्रकरणी प्रियांकाच्या वडिलांची चौकशी करण्यासाठी पोलीस तिच्या घरी गेले. मात्र तिचे वडील घरी नव्हते. त्यामुळे पोलिसांनी प्रियांका आणि तिच्यासोबत असलेल्या एका महिलेला बेदम मारहाण केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. पोलिसांनी मात्र हा आरोप फेटाळलाय.

close